Wednesday, December 15, 2010

इडली, आजी आणि तो

आज नेहमीप्रमाणे आवरून office ला जाण्यासाठी निघाले . रस्त्यात एक इडलीवाला आहे , मस्त इडली मिळते ,
तिथे इडली खाण्यासाठी गेले असताना एक गरीब आज्जीबाई आल्या ... देवाच्या नावाने काहीतरी द्या अस म्हणत होत्या
रोजचाच चित्र बरीच माणसआधीपासन उभी होती त्या म्हातारीकडे लक्ष न देता ....
मी अज्जीबींना विचारल इडली खाणार का ?
इडलीची order देणार इतक्यातच एक तिथे थांबलेला दादा म्हणाला ... मी दिलीये order ...
I say thanks ...
आणि तो गाडी वळवून निघून गेला स्वत इडली न खाता ... ....

Friday, October 29, 2010

बेभान,उन्मक्त , सर भैर वारा ...

बेभान,उन्मक्त , सर भैर वारा ...



वाहायचा असाच सुसाट..

एके दिवशी ... एके दिवशी

एक अलगद अस मोरपीस त्याला स्पर्शून गेल..

तो थांबला .. त्याने पाहिलं..

बेभान, उन्माक्त्पानाची सगळी लक्तर गळून पडली.. .

पुढे होती एक " चैत्यान्याने "माखलेली , हिरवा चुडा ल्यालेली .. एक नाजून वेल..

तो क्षणात विरघळला .. ...

वार्याची पार झुळूक झाला ....

त्यातला बदल त्याला जाणवला.. पटला ...



वेलीला सांगण्याचा त्यांचा अपर प्रयत्न आणि स्वत्याच्या धुंदीत अश्णारी नाजुग वेडी वेल ...

आणि वार्याला जाणवणारी एक सत्यता...

जाणवल त्याला

कितीही बेभान राहिलो ...

तरी एक बेदी आहे , एक काटेरी कुंपण आहे ... जिचे काटे आपली हि साजणी नाही सहन करू शकणार

......

त्यानेही घेतली माघार ... परतवल सगळ जसच्या तस ....





आता थांबलाय तो..

कुणीच नसताना कुणाचीतरी वाट बघत

On bench!!

आज office मध्ये आले आणि कळल कि आजही कोणतीच म्हणावी तशी task नाहीये..

म काय मनातल्या मनात ४-५ उड्या मारून घेतल्या आणि बसले एकूण एक blogs धुंडाळत ...

मला हेच समजत नाही जर कंपनी ला माझ्या on bench असण्याच tension नाहीये तर मला कशाला असेन... नाही का?

आणि ह्या इंटरनेट च्या महा जालात कोण एकटा माणूस असेन ???

आणि ह्या उपर कुणालाही बोर होण हि त्या त्या व्यक्तीची मानसिक स्थिती आहे .....

हे आमच्या कंपनी च्या हिरोईन ला येऊन सांगा .....!!!

Tuesday, June 22, 2010

तो क्या हुआ गर ये मंजिल नहीं मिली ...
मंजिले इस जहा में अभी बहोत है ...
देखे कितने कहर धाती है किस्मत ...
इन बाजुओं में जोर अभी बहोत है ..

Tuesday, June 8, 2010

मी प्रेमात पडलेय..

मी प्रेमात पडलेय..

हं आता हे वाचून कोणालाही वाटेन, त्यात काय नवीन ..? रोज कितीतरी जन प्रेमात पडतात तुही त्यातलीच एक ...!

असेनही ...
पण मी प्रेमात पडलेय ह्या आयुष्याच्या आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणांच्या. केव्हापासन आठवत नाही पण जेव्हापासन गोड गोड , मोरपिशी क्षणांची नाजूकता जाणवू लागली न कदाचित तेव्हापासन आणि नंतर ते मला हवेहवेसे वाटायला लागले ...

या सृष्टीच्या निर्मात्याने असे खुपसे दवबिंदू आपल्याला बहाल केलेत ..
तप्त उन्हातल्या सोनेरी किरणांवर प्रेम केलात न कि नंतरचा सुखद पाउस काहीतरी खासच फक्त आपल्याचसाठी बरसतोय अस वाटून जाणारा ... त्या मदमस्त पावसाच्या मी प्रेमात पडलेय !!

त्यामागन चोरपावलांनी येणाऱ्या गोड-गुलाबी थंडीत उबदार शाल पांघरून गच्चीत बसून निरभ्र आकाश बेधुंद पाने निरखत बसायचं .. किती निवांत तो क्षण !!

आपल मन न खूप हट्टी आहे सतत काही न काही मागत असत, हे जाणूनच मग त्याने निर्माण केली असंख्य नाती. जीवनाचा कोपरा न कोपरा समृद्ध करणारी, प्रत्येक नात्यात त्याने त्याच अंश तर ठेवलाच फक्त वेगवेगळी नावे त्यांना दिली. कधी आई-बाबा , कधी ताई-दादा ,तर कधी मित्र-मैत्रिणी ..

मला अजूनही आठवतो आईच्या हातचा पहिला धपाटा ... आई ग! अजूनही आठवलं न कि गाल लाल झाल्यासारखं वाटत इतका जबर होता तो .. पण मी प्रेमात पडलेय त्या क्षणांच्या . अजूनही वाटत कधी चुकलेच तर असाच सपाटून बसावा ,तितक्याच मायेन आणि पुन्हा कधीच चुकुनसुद्धा चुकू नये आपण त्या वळणावर!

बाबांनी बक्षीस म्हणून मला cycle घेऊन दिली होती . मग काय सुसाट फिरवायचो ती कशीही , वेडीवाकडी , सर्कशीतले वेगवेगळे प्रयोग करत. ते ठेचलेले गुढगे , रक्ताळलेली मंगत घेऊन घरी परतायचं .. कुणाला सांगायची पण चोरी न ..
मी प्रेमात पडलेय त्या मनमुराद क्षणांवर

घड्याळाचे काटे पण सतत फिरत असतात वाटत धरून ठेवाव आणि म्हणव थांब न रे बाबा थोडा वेळ .
एक दिवस आम्ही घाई घाई ने हॉस्पिटल मध्ये गेलो. ताई ने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता त्याला पहिल्यांदा पाहिलं न ,कुशीत घेतलं न.. अहाहा .. त्याचे इवले इवले हात -पाय , इवडीशी जीवनावळ, पिटुकले डोळे ... तो क्षण सर्वोत्कृष्ट !!!

असे कितीकासे क्षण येतात आणि जातात आणि ते ज्याने मुक्त हस्ताने बहाल केलेत न त्या वर तर मी निस्सीम प्रेम करते .
कुणी त्याला देव म्हणत कुणी काही ... मी त्याला श्री म्हणते .

अवघड वाटणाऱ्या क्षणात तर तोच होता. अगदी आई गेली तेव्हा , DS back होता तेव्हा...
असे न मोजता येणारे खुपसे क्षण ..
शाळेचा पहिला दिवस, आवडत्या सर-mam कडून होणार कौतुक , मित्र-मैत्रिणीसोबत केलेली धमाल, निव्वळ वेडेपणा, थंडगार थंडीत खाल्लेलं Ice -cream , चोरून पाहिलेला सिनेमा, नियम मोडण्यासाठीच असतात म्हणून मोडलेले नियम .. ..

ह्या क्षणांची एक पोतडी मी नेहमीच जवळ ठेवते. आणि काहीतरी हरवलाय,कुठेतरी चुकतंय अस वाटायला लागल्यावर धुंडाळत बसते त्यात काहीतरी .. आपसूकच हसू येत चेहऱ्यावर आणि बाल मिळत काय चुकलय, हरवलय हे शोधायला .


त्या श्री चे तर असंख्य आभार !
आणि मला दिसू लागतो तो श्री जो मुक्त हस्ताने उधळण करतोय असाच सुंदर सुंदर क्षणांची आणि म्हणतोय
" ए येडू , तुझ्याचसाठी आहेत रे .. असाच मनसोक्त प्रेम करत रहा..! "
love u बेटा....!!!