Tuesday, June 22, 2010

तो क्या हुआ गर ये मंजिल नहीं मिली ...
मंजिले इस जहा में अभी बहोत है ...
देखे कितने कहर धाती है किस्मत ...
इन बाजुओं में जोर अभी बहोत है ..

Tuesday, June 8, 2010

मी प्रेमात पडलेय..

मी प्रेमात पडलेय..

हं आता हे वाचून कोणालाही वाटेन, त्यात काय नवीन ..? रोज कितीतरी जन प्रेमात पडतात तुही त्यातलीच एक ...!

असेनही ...
पण मी प्रेमात पडलेय ह्या आयुष्याच्या आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणांच्या. केव्हापासन आठवत नाही पण जेव्हापासन गोड गोड , मोरपिशी क्षणांची नाजूकता जाणवू लागली न कदाचित तेव्हापासन आणि नंतर ते मला हवेहवेसे वाटायला लागले ...

या सृष्टीच्या निर्मात्याने असे खुपसे दवबिंदू आपल्याला बहाल केलेत ..
तप्त उन्हातल्या सोनेरी किरणांवर प्रेम केलात न कि नंतरचा सुखद पाउस काहीतरी खासच फक्त आपल्याचसाठी बरसतोय अस वाटून जाणारा ... त्या मदमस्त पावसाच्या मी प्रेमात पडलेय !!

त्यामागन चोरपावलांनी येणाऱ्या गोड-गुलाबी थंडीत उबदार शाल पांघरून गच्चीत बसून निरभ्र आकाश बेधुंद पाने निरखत बसायचं .. किती निवांत तो क्षण !!

आपल मन न खूप हट्टी आहे सतत काही न काही मागत असत, हे जाणूनच मग त्याने निर्माण केली असंख्य नाती. जीवनाचा कोपरा न कोपरा समृद्ध करणारी, प्रत्येक नात्यात त्याने त्याच अंश तर ठेवलाच फक्त वेगवेगळी नावे त्यांना दिली. कधी आई-बाबा , कधी ताई-दादा ,तर कधी मित्र-मैत्रिणी ..

मला अजूनही आठवतो आईच्या हातचा पहिला धपाटा ... आई ग! अजूनही आठवलं न कि गाल लाल झाल्यासारखं वाटत इतका जबर होता तो .. पण मी प्रेमात पडलेय त्या क्षणांच्या . अजूनही वाटत कधी चुकलेच तर असाच सपाटून बसावा ,तितक्याच मायेन आणि पुन्हा कधीच चुकुनसुद्धा चुकू नये आपण त्या वळणावर!

बाबांनी बक्षीस म्हणून मला cycle घेऊन दिली होती . मग काय सुसाट फिरवायचो ती कशीही , वेडीवाकडी , सर्कशीतले वेगवेगळे प्रयोग करत. ते ठेचलेले गुढगे , रक्ताळलेली मंगत घेऊन घरी परतायचं .. कुणाला सांगायची पण चोरी न ..
मी प्रेमात पडलेय त्या मनमुराद क्षणांवर

घड्याळाचे काटे पण सतत फिरत असतात वाटत धरून ठेवाव आणि म्हणव थांब न रे बाबा थोडा वेळ .
एक दिवस आम्ही घाई घाई ने हॉस्पिटल मध्ये गेलो. ताई ने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता त्याला पहिल्यांदा पाहिलं न ,कुशीत घेतलं न.. अहाहा .. त्याचे इवले इवले हात -पाय , इवडीशी जीवनावळ, पिटुकले डोळे ... तो क्षण सर्वोत्कृष्ट !!!

असे कितीकासे क्षण येतात आणि जातात आणि ते ज्याने मुक्त हस्ताने बहाल केलेत न त्या वर तर मी निस्सीम प्रेम करते .
कुणी त्याला देव म्हणत कुणी काही ... मी त्याला श्री म्हणते .

अवघड वाटणाऱ्या क्षणात तर तोच होता. अगदी आई गेली तेव्हा , DS back होता तेव्हा...
असे न मोजता येणारे खुपसे क्षण ..
शाळेचा पहिला दिवस, आवडत्या सर-mam कडून होणार कौतुक , मित्र-मैत्रिणीसोबत केलेली धमाल, निव्वळ वेडेपणा, थंडगार थंडीत खाल्लेलं Ice -cream , चोरून पाहिलेला सिनेमा, नियम मोडण्यासाठीच असतात म्हणून मोडलेले नियम .. ..

ह्या क्षणांची एक पोतडी मी नेहमीच जवळ ठेवते. आणि काहीतरी हरवलाय,कुठेतरी चुकतंय अस वाटायला लागल्यावर धुंडाळत बसते त्यात काहीतरी .. आपसूकच हसू येत चेहऱ्यावर आणि बाल मिळत काय चुकलय, हरवलय हे शोधायला .


त्या श्री चे तर असंख्य आभार !
आणि मला दिसू लागतो तो श्री जो मुक्त हस्ताने उधळण करतोय असाच सुंदर सुंदर क्षणांची आणि म्हणतोय
" ए येडू , तुझ्याचसाठी आहेत रे .. असाच मनसोक्त प्रेम करत रहा..! "
love u बेटा....!!!